‘ने हि वेरेन वेरानि’ : ‘धम्मपदां’चा विचारवारसा सांगत ‘अहिंसेचं तत्त्वज्ञान’ मांडू पाहणारं चिंतनशील नाटक
‘धम्मपदा’तील एक श्लोक म्हणजे या नाटकाचं शीर्षक. हा नीतिपर धार्मिक जीवन कसं जगता येईल, हे सांगणाऱ्या वचनांचा स्फुटसंग्रह आहे. त्यात २६ अध्याय आणि ४२३ श्लोक आहेत. त्यांत सर्व पापांपासून दूर राहावं, कुशल गोष्टी संपादन कराव्यात, स्वत:च्या चित्ताची परिशुद्धी करावी, क्षमाशील वृत्ती ठेवावी, कोणाला त्रास देण्याची किंवा इजा करण्याची प्रवृत्ती ठेवू नये, हे तत्त्वज्ञान सांगितलं आहे.......